आजकाल फेक गोष्टींची खूप चलती आहे. मग ती फेक न्यूज असो, फेक आयडेंटीटी असो, की फेक चार्जर असो! हो, मार्केट मध्ये तुम्हाला मिळत असलेला चार्जर ओरिजिनल असेलच असे नाही. हीच गोष्ट डेटा केबल्सना सुद्धा लागू होते. कधी कधी सेलमध्येही तुम्हाला हा कंपनीचा ओरिजिनल माल आहे असे सांगून सुद्धा खोटे चार्जर आणि डेटा केबल्स विकले जाऊ शकतात. याशिवाय ऑनलाईन शॉपिंग मध्ये सुद्धा तुम्ही ओरिजिनल म्हणून ऑर्डर केलेला चार्जर किंवा डेटा केबल खरी असेलच असे नाही. त्यामुळे सावध राहायला हवं आणि यासाठी फेक चार्जर आणि डेटा केबल्स ओळखता यायला हव्यात!
तुम्ही कोणत्याही दुकानात एखादे चार्जर खरेदी करायला गेलात आणि दुकानदार म्हणाला की, “हे ओरिजिनल चार्जर आहे आणि याची किंमत १००० रुपये आहे.” तर लगेच ते खरेदी करू नका. अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणी युएसबी केबल जोडणार आहात ते सॉकेट नीट पहा. याच्या भोवती जे कट्स असतात त्यांची फिनिशिंग ओरिजिनल चार्जर मध्ये वर आलेली असते आणि अगदी शार्प फिनिशिंग असते. पण फेक चार्जर वा डुप्लिकेट चार्जर मध्ये हीच फिनिशिंग अत्यंत खालच्या दर्जाची असते. जणू केवळ ओरिजिनल चार्जर वाटावा म्हणून त्याची केलेली कॉपी वाटते.
याच जागेमध्ये अजून एक गोष्ट लक्ष देण्यासारखी असते ती म्हणजे या सॉकेटचा आकार होय. फेक चार्जर मध्ये हा आकार काहीसा मोठा पाहायला मिळतो. अर्थात या मागे सुद्धा खराब फिनिशिंग हेच कारण असते.
चार्जर हे ओरिजिनल आहे की नाही हे ओळखण्याची अजून एक पद्धत म्हणजे अॅडाप्टर हातात घेऊन पहा. ओरिजिनल चार्जरचे वजन हे जास्त असते. तर तोच चार्जर फेक असेल तर त्याचे वजन खूप हलके असते. याला बिल्ड क्वालिटी म्हणतात.
हे झालं चार्जरचं पण केबल डुप्लीकेट की ओरिजिनल हे कसं ओळखायचं? तर नेहमी लक्षात ठेवा केबल घेतल्यावर ती फोन मध्ये घालून पहा. जर केबल पूर्ण आत फिट होत असेल तर ती ओरिजीनल केबल आहे. ओरिजिनल केबल अजिबात सैल बसत नाहीत. याउलट केबल फेक असेल तर ती पूर्ण आत बसणार नाही आणि थोडा गॅप त्यामध्ये राहील.
केबल सुद्धा ओरिजिनल आहे की नाही हे त्याच्या बिल्ड क्वालिटी वरून कळते. जर ओरिजिनल केबल असेल तर ती जाड आणि कडक असते. तुम्ही ती दुमडली तरी ती पुन्हा सरळ होते. या उलट जर डुप्लीकेट केबल असेल आणि तुम्ही ती दुमडली तर ती तशीच राहिलं. तर हा एक फरक लक्षात ठेवा.
पाहिलंत? आहे की नाही अगदी सोप्पी ट्रिक? ही माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि काहीही खरेदी करताना नेहमी सतर्क राहा!
So supper l