भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात राहणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या क्रिकेटप्रेमीला हा प्रश्न कधी ना कधी पडला नसेल तर नवलच! ‘मवाली’च्या मनात सुद्धा कधी पासून हा प्रश्न घिरट्या घालत होता. म्हटलं पाहुया तरी काय आहे नक्की कारण? स्वत:ला जगभरात महासत्ता आणि प्रगत म्हणवून घेणाऱ्या आणि फुशारक्या मारत फिरणाऱ्या या देशांना अशी कोणती गोष्ट आहे जी क्रिकेट मध्ये येण्यापासून अडवते आहे? जे उत्तर आम्हाला मिळालं ते तुम्हाला सुद्धा नक्कीच अचंबित करेल.
हे उत्तर जाणून घेण्याआधी आपण भारतात क्रिकेट का प्रसिद्ध आहे हे सुद्धा जाणून घ्यायला हवे. भारतात क्रिकेट हा खेळ आणला कोणी तर आपल्यावर सुमारे १५० वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांनी! भारत हा एक तरुण देश आहे जो १९ व्या शतकात इंग्रज राजवटीतून मुक्त झाला आहे. इंग्रज जेव्हा इथे आले तेव्हा ते आपल्या अनेक गोष्टी इथे घेऊन आले , पण जाताना सर्वच गोष्टी घेऊन गेले नाहीत आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे क्रिकेट होय.
इंग्रज हे क्रिकेटला जंटलमन गेम म्हणायचे. म्हणजे श्रीमंत लोकांचा अगदी आरामात खेळला जाणारा खेळ. त्यामुळे आपल्याकडच्या श्रीमंतांनी सुद्धा स्वत:चे स्टेटस दाखवण्यासाठी हा खेळ शिकून घेतला आणि हीच सुरुवात होती क्रिकेट भारतात रुजण्याची! ही गोष्ट जी भारतासोबत झाली ती वर आपण ज्या ज्या देशांची नावे घेतली त्या देशांसोबत आणि ज्या देशांत आजही क्रिकेटला कोणी विचारत नाही त्या देशांसोबत घडली नाही.
म्हणजे तेथील लोकांना आजही क्रिकेट कळत नाही, कारण हा खेळ कधी तिथे रुजलाच नाही. ना तेथील सरकारने कधी तो रुजू दिला. कारण हा एक खूप वेळ चालणारा खेळ आहे आणि असा खेळ तेव्हा बोरिंग समजला जायचा, या उलट ऑलम्पिकची क्रेझ अगदी १८ व्या शतकापासून या देशांमध्ये होती. झटपट निकाल आणि चुरशीची स्पर्धा यामुळे ऑलम्पिक प्रकारातील खेळ या देशांत जास्त रुजले गेले.
आता तुमच्याही लक्षात आले असेल की हे सर्व देश ऑलिम्पिक मध्ये एवढे मेडल्स का घेऊन येतात ते, आणि भारत एवढा पिछाडीवर का? आजही या देशांत शाळेपासूनच लहान मुलांना ऑलिम्पिक प्रकारातील खेळांची आवड लावली जाते. त्यासाठी त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. या उलट स्थिती भारतामध्ये आहे. जेथे बाकी सर्व खेळ सोडून क्रिकेटला महत्त्व दिले जाते.
पण असे अजिबात नाही की या देशांनी कधीच क्रिकेट हा खेळ खेळला नाही आहे. चीन, अमेरिका, जपान, फ्रान्स, रशिया आणि अन्य देशांत काही मोजक्या क्रिकेट टीम्स आहेत, पण त्या कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पात्र ठरल्या नाहीत. अमेरिकेची टीम मध्यंतरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये उतरणार अशी उडती बातमी कानावर आली होती. पण फंडिंग नाही हे कारण देऊन त्यांचा गाशा गुंडाळला गेला. हीच गत अन्य देशांतील टीम्सची सुद्धा आहे. त्यांना योग्य सुविधा मिळत नाही आणि त्यामुळे ते आपला खेळ सुधारून आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी पात्र होत नाहीत.
हेच कारण आहे की क्रिकेट हा फक्त बोटावर मोजता येणाऱ्या देशांमध्ये खेळला जातो.
0 Comments