वयाच्या ५ व्या वर्षी लकवा मारलेला मुलगा कसा बनला १० हजार कोटींच्या कंपनीचा मालक?

१९९५ सालापासून रामदेव बाबांनी मोठ्या प्रमाणावर योग शिबिरे आयोजित करण्यास सुरुवात केली होती. त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून देशातील उद्योजक, नेते, सेलिब्रिटी त्यांच्या शिबिरांना उपस्थिती लावू लागले. हळूहळू पैसा खेळू लागला.


बाबा रामदेव एक असे नाव जे भारतात कोणाला माहित नाही असे होणारच नाही. म्हणजे शेंबड्या पोराला विचारले तरी तो पण उत्तर देईल की, “टीव्हीवर येऊन व्यायाम शिकवतात ते दाढीवाले काका!” पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा मनुष्य इतका प्रसिद्ध कसा झाला? कोण आहेत रामदेव बाबा? ते कुठून आले? भूतकाळ काय त्यांचा? आता असं तर नाही ना की जन्माला आल्यापासून ते डायरेक्ट रामदेव बाबा झाले. कुठून तरी सुरुवात झालीच असेल की? तर अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडणारा हा खास मवाली स्पेशल लेख तुमच्यासाठी!

Source : siasat.com

रामदेव बाबांचा जन्म १९६५ साली हरियाणा मधील सैयदपूर नावाच्या छोट्याश्या गावात झाला! त्यांचे खरे नाव राम किशन यादव होय. त्यांचे आई वडील रामनिवास यादव आणि गुलाबी देवी दोघेही शेतकरी वर्गातले, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. या सर्वसामान्य कुटुंबावर १९७३ साली संकट कोसळले जेव्हा छोटा राम किशन फक्त ८ वर्षांचा होता.

शाळेतून घरी येता येत अचानक छोट्या राम किशनला लकवा मारला. डॉक्टरांनी सांगितले की याच्या शरीराची डावी बाजू कायमची अपंग झाली आहे. पण या मुलामध्ये काहीतरी वेगळीच शक्ती होती तो खचला नाही.

दोन वर्षांनी त्याच्या हाती दयानंद सरस्वती लिखित सत्यार्थ प्रकाश नावाचे पुस्तक लागले. या पुस्तकामधून योग आणि अध्यात्म यांच्या विचारांचा कधीही उतरला न जाणारा पगडा छोट्या रामकिशनच्या मनावर ठाण मांडून बसला. त्याने तेव्हाच ठरवले की सगळे आयुष्य योगविद्या संपादन करण्यात घालवायचे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण रामकिशन यादवला एक सामान्य मनुष्य म्हणून जगताना पाहू शकतो.

योगच्या माध्यमातून त्याने आपल्या अपंगत्वावर मात केली. पुढे शाळेतील शिक्षणात मन लागत नाही म्हणून त्याने अर्श गुरुकुल मध्ये प्रवेश घेतला आणि भारतीय प्राचीन शिक्षण व्यवस्थेनुसार शिक्षण घेऊ लागला. इथेच त्याला मिळाला आयुर्वेदामध्ये रस असणारा जिगरी मित्र बालकृष्ण, तेव्हा या दोघांना माहितही नव्हते की भारतातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक कंपनीचे ते भविष्यात मालक असणार आहेत.

तर  वयाच्या २५ व्या वर्षी रामकिशन यादवने संन्यास घेतला आणि बाबा रामदेव हे नाव धारण केले. एव्हाना त्यांनी योगविद्या, संस्कृत आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टींत प्रभुत्व मिळवले होते. बाबा रामदेव यांनी काही काळ मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात घालवला. तेथून ते हरिद्वारच्या कांगरी विश्वविद्यालय या गुरुकुल मध्ये येऊन पोहोचले आणि विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचे ज्ञान देऊ लागले. याच काळात त्यांनी योग शिकवायला सुद्धा सुरुवात केली होती आणि हळूहळू योगगुरू म्हणून रामदेव बाबा प्रसिद्ध पावू लागले.

त्यांच्या या योगविद्येने गुजरात मधील एक हिरे व्यापारी खूप प्रभावित झाला व त्याने त्यांचे एक मोठे शिबीर आयोजीत केले. हीच सुरुवात होती रामदेव बाबा हे नाव भारतभर नाही तर जगभर पोहोचण्याची आणि पतंजली या कंपनीच्या निर्माणाची!

१९९५ सालापासून रामदेव बाबांनी मोठ्या प्रमाणावर योग शिबिरे आयोजित करण्यास सुरुवात केली होती. त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून देशातील उद्योजक, नेते, सेलिब्रिटी त्यांच्या शिबिरांना उपस्थिती लावू लागले. हळूहळू पैसा खेळू लागला. रामदेव बाबा हे नाव घराघरात पोहोचले. २००१ साली टीव्हीवर ‘संस्कार’ नामक अध्यात्मिक चॅनेल वर रोज सकाळी रामदेव बाबांचा योग शो सुरु झाला. आता रामदेव बाबा हे शो फुकट तर करत नव्हते हे तर तुम्हालाही कळले असेलच.

हळूहळू एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीकडे ते गेले. स्वत: रामदेव बाबा नावाचा एक ब्रँड  निर्माण झाला. न्यूज चॅनेल्सवर सुद्धा ते झळकू लागले. या सर्व घडामोडीत कंपनी स्थापन करण्याची योजना हळूहळू आकार घेत होती आणि अखेर  आपला मित्र बालकृष्ण याच्या साथीने रामदेव बाबा यांनी २००६ साली पतंजली कंपनीची स्थापना त्यांनी केली आणि ते एव्हाना ते स्वत:च एक ब्रँड  झाले असल्याने कंपनीला वेगळ्या मार्केटिंगची गरज भासली नाही व अल्पावधीतच कंपनीने करोडोंचा टर्नओव्हर पार केला जो आजही वर्षागणिक वाढत चालला आहे.

Source : twimg.com

अनेक मार्केटिंग एक्सपर्ट म्हणतात की कोणताही बिझनेस असो तो भारतात चालतोच चालतो, कारण भारतात तेवढी लोकसंख्या आहे आणि लोक सहज कोणत्याही गोष्टीला भूलणारी आहेत. फक्त तुम्हाला योग्य मार्केटिंग करता यायला हवी आणि जे लोकांना हवंय ते देता यायला हवं. बाबा रामदेव हे जरी संन्यासी असले तरी लोकांमध्ये राहून त्यांनी ही गोष्ट अचूक हेरली. याच जागी जर साधा सुद्धा कोणी बाबा असता तर तो आजही शिबिरे घेत बसला असता. पण या व्यक्तीकडे दूरदृष्टी होती. स्वत:ची ओळख निर्माण करण्याची धडपड होती.

 आज भले एक संन्यासी बिझनेस कसा करतो म्हणून त्यांच्यावर टीका होत असेल पण भारतात एक संन्यासी सुद्धा बिझनेस करू शकतो हे रामदेव बाबांनी सिद्ध करून दाखवले!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal